#Governorgobackतुम्ही आमचे राज्य चालवता की आम्ही तुमची पोटं भरतो? शेतकऱ्याचा राज्यपालांना सवाल
X
मुंबई देशातील सर्वात मोठी शेतमालाची बाजारपेठ आहे. महाराष्ट्राने गुजराती संपूर्ण भारतीयांच्या रोजीरोटीची व्यवस्था उभी केली आहे. तुम्ही राज्यात चालवता की आम्ही तुमची फोटो भरतो असा खडा सवाल प्रगतिशील शेतकरी शिवाजी आवटे यांनी राज्यपाल भगतसिंग यांना उपस्थित केला आहे.
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाने यापूर्वीही वाद झाला आहे. मुंबई आणि मराठी वाद पुन्हा उफाळून आला असताना प्रगतिशील शेतकरी शिवाजी आवटे यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.
गुजराती आणि राजस्थानी लोकं मुंबई चालवत आहे असे राज्यपाल मोहदय म्हणतात .ठिकं आहे आम्ही महाराष्ट्रीयन म्हणून एक वेळ समजून घेऊ .कारण महाराष्ट्राने गुजराती राजस्थानीच नव्हे संपूर्ण भारतीयांच्या रोजीरोटी ची व्यवस्था केली आहे. आज गुजरात राजस्थान कर्नाटक मध्यप्रदेश या राज्यातील शेतीमालाला मुंबई ही हक्काची बाजारपेठ उपलब्ध आहे. मुंबईत येणाऱ्या दररोजच्या भाजीपाल्यामध्ये वरील राज्यातील शेतीमालाचे प्रमाण प्रचंड आहे .माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आमचे राज्य चालवता की आम्ही तुमची पोटं भरतो.
मुंबई जेव्हा गुजरात राजस्थान अस्तित्वात पण नव्हते तेव्हा पासून स्वतः च्या ताकदीवर उभी आहे. तिने फक्त गुजराती राजस्थानी च मोठे केले नाही. तर इंग्रजांना जगावर राज्य करण्याइतके मोठं केलं होतं . इंग्रजांनी मुंबई सोडली तेव्हा पासून त्यांना स्वतः चे अस्तित्व पण टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
गुजराती राजस्थानीच काय कुणालाही असे वाटतं असेल की आम्ही मुंबई चालवतो तर मुंबई तुम्ही सोडून द्या . काय होतंय ते मुंबई बाहेर जाऊन पहा. कुणाला काही ही वाटो पण मध्यमवर्गीय ग्राहक मुंबई चालवतो . ह्या मध्यम वर्गीय ग्राहकांनी मुंबई विकसित केली आहे . त्यात मुंबईला लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य हे मुंबई चे प्रचंड मोठं बलस्थान आहे.
राज्यपाल महोदयांनी जे वक्तव्य केले आहे हे एका अर्थाने चांगलेच केले कारण त्यांच्या एका वाक्याने महाराष्ट्राची राजकीय दिशा बदलून जाऊ शकते . प्रत्येक दिवशी दिल्ली वारी करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना स्वतः ची काही विचार करण्याची शक्ती आहे की नाही असा प्रश्न पडतो. कुणाचे किती ऐकावं याला सुद्धा मर्यादा असतात .
यावर सारवासारव होईल माफीनामा येईल गुडघे टेकले जातील पण महाराष्ट्रातील ग्राहकांनी बाजारात जाताना हे वाक्य मनावर कोरून ठेवावे की मी यांना मोठं करून माझं अस्तित्व तर संपवत नाही ना .
शिवाजी आवटे