कुशलच्या निधीवरून यशोमती ठाकूर आक्रमक; अजित पवार यांच्यावरच टीका
कृष्णा कोलापटे | 19 July 2023 1:49 PM IST
X
X
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरू आहे. आजही सर्वसामान्याच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून शेती आणि खतांच्या किमतीवरुन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि विजय वडेट्टीवर आधी आमने-सामने आले. त्यानंतर कृषी निधी आणि कुशलच्या पैशांवर सभागृहात एकच गोंधळ उडाला. कृषी निधीसंदर्भात भेदभाव केला जातोय. तर विरोधकांना कुशलचा निधी दिला जात नाही असा थेट आरोप काँग्रेस नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधताना ते आधी विरोधकांच्या असताना प्रश्न रेटून मांडायचे पण आता सत्ताधारी बाकावर बसून भाषा बदलत आहेत अशी टीका देखील ठाकूर यांनी केली.
Updated : 19 July 2023 1:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire