Home > News Update > Yakub Memon च्या कबरीचा वाद, जामा मशीद ट्रस्टने आरोप फेटाळले

Yakub Memon च्या कबरीचा वाद, जामा मशीद ट्रस्टने आरोप फेटाळले

Yakub Memon च्या कबरीचा वाद, जामा मशीद ट्रस्टने आरोप फेटाळले
X

1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी झालेल्या दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) मुंबईतील कबरीचा वाद आता पेटला आहे. या कबरीचे सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले असा आरोप करत भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर या कबरस्थानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जामा मशीद (Jama Masjid) मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष, शोएब खतीब (Shoaib khatib)यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनच्या (Yakub Memon)फाशीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर त्याला फासावर चढवण्यात आले होते. त्यानंतर मेमनच्या पार्थिवाचा मुंबईत दफनविधी करण्यात आला होता. पण आता याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आल्याचा आरोप करत भाजपने (BJP) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करत आरोप केले आहेत.

पण आता यासर्व प्रकरणात कब्रस्तानचे व्यवस्थापन करणाऱ्या जामा मशीद मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष, शोएब खतीब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "याकूब मेमनने देश हिताविरोधात कृत्य केल्याने त्याच्या कबरीचे सुशोभिकरण करण्याचा प्रश्नच नाही. तर ज्या ठिकाणी मेमनची कबर आहे तिथे इतर १७ जणांच्या कबरी आहेत, त्या जागेतील माती झाड पडल्याने बाहेर येत होती, म्हणून त्याला टाईल्स लावण्यात आल्या. तसेच रात्रीच्या वेळी येणाऱ्या अंत्ययात्रेतील लोकांच्या सोयीसाठी लाईट लावण्यात आले होते, ते याकूबच्या कबरीसाठी लावण्यात आले नव्हते" असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. एवढेच नाही तर शब्बे बारातसाठी कब्रस्तानात लाईटिंग करण्यात आली होती, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे याकूबच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आल्याचा आरोप फेटाळत त्यांनी हे वृत्त साफ खोटे असल्याचे म्हटले आहे.

Updated : 8 Sept 2022 1:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top