Home > News Update > World Population Day: भारत चीन ला मागे टाकणार का?

World Population Day: भारत चीन ला मागे टाकणार का?

World Population Day: भारत चीन ला मागे टाकणार का?
X

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या बाबत समाजामध्ये जागृकता यावी यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. (World Population Day 2021) जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चीन (China population) जगात सर्वांधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. (World Population Day 2021 India Population) आणि त्यानंतर यूनाइटेड स्टेट (World Population Day 2021 United state America Population), चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया आणि पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा नंबर लागतो. (World Population Day 2021 Pakistan population)

ज्या पद्धतीने जगाची लोकसंख्या वाढत जाते. त्या पद्धतीने नागरिकांच्या समस्यांसोबतच पर्यावरणाचा समतोल देखील ढासळत जातो. त्यामुळं भारत आणि चीन यासारख्या विकसनशील देशात वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय आहे.

वर्ल्डोमीटर या वेबसाईट नुसार (Worldometer elaboration) भारताची लोकसंख्या 9 जुलै 2021 ला 139 कोटी (1,393,790,539 ) इतकी होती. तर 2020 मध्ये भारताची लोकसंख्या 138 कोटी होती. म्हणजे एका वर्षात भारताची लोकसंख्या 1 कोटी होती. भारताचा लोकसंख्या वाढीचा हाच दर कायम राहिला तर भारत काही दिवसात चीन ला मागे टाकतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाढत्या लोकसंख्या मुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं लोकसंख्या नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामुळंच भारत सरकारने 'हम दो हमारे दो' या सारखे कार्यक्रम हाती घेतले. तर चीन सारख्या देशांनी 'हम दो और हमारा एक' हा कार्यक्रम हाती घेतला होता.

कोराना काळात वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारला कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करताना अडचण निर्माण झाली. तसंच बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साथीच्या आजारात लोकसंख्या जास्त असेल तर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो. त्यामुळं आता गरीबीचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जागतिक लोकसंख्या नियंत्रीत ठेवणं गरजेचं आहे.

भारताची लोकसंख्या अधिक असल्यामुळं भारतात मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं.

• टीबी (Tuberculosis)

• मलेरिया (Malaria)

• हैजा (Cholera)

• डेंगू ताप (Dengue fever)

• संक्रमीत आजार (infectious diseases)

Updated : 11 July 2021 9:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top