World Hindi Day 2023 :जगभरात साजरा केला जातो १० जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस...
X
जगभरात हिंदी ही भाषा २६ कोटी लोकांकडून बोलली जाते. ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. जगभरातील सर्वाधिक बोलली जाणारी ही जगातील चौथी भाषा आहे. ही भारत सरकारची राजकीय भाषा आहे. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी दरवर्षी १० जानेवारी रोजी विश्व हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी हा संकल्प घेण्यात आला आहे की, हिंदी भाषा ही सर्वसामान्यांची भाषा बनवायची आहे. तुमच्या मातृभाषेचा तुम्हाला विसर न पडता हिंदी भाषा आत्मसाद करायला लावणे, हा या मागचा उद्देश आहे.
१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्या जागतिक हिंदी संम्मेलनाचे उद्धाटन केले होते. त्यानंतर भारतासह संयुक्त राष्ट्र अमेरिका, यूनाईटेड किंगडम, मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबैगो सारख्या विविध देशामध्ये जागतिक हिंदी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. जागतिक हिंदी दिवस सर्वप्रथम १० जानेवारी २००६ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १० जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.