आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं आहे. या अधिवेशनात भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आता पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे
X
मुंबई // आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं आहे. या अधिवेशनात भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आता पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाच दिवसांच्या अधिवेशनामध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पाच दिवसांचा असणार आहे. आज अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आक्रमक निदर्शने करण्याची रणनिती आखल्याची माहिती आहे.
सोबतच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षण, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, आमदारांचे निलंबन अशा अनेक मुद्द्यांवरून भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात काही शंका नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशिल असलेले 'शक्ती' विधेयक विधिमंडळाच्या पटलावर आणणार आहे. या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगण्याची शक्यता आहे.
त्याच बरोबर प्रलंबित ५ विधेयकं आणि प्रस्तावित २१ विधेयकं ही विधिमंडळाच्या पटलावर येणार आहेत. या पाच दिवसांच्या अधिवेशनात किती विधेयकांना मंजूरी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मात्र, आज पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीकडे. मणक्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच सर्वांच्या समोर येणार आहेत. याआधी ते सकाळी 9 वाजता विधामंडळात सत्ताधारी महविकास आघाडी सरकारच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत विधानसभेचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्याता आहे.