Home > News Update > भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या शिगेला पोहोचणार?

भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या शिगेला पोहोचणार?

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकारामुळे दररोज रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. 1 जानेवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात कोरोनाची 22,775 नवीन प्रकरणे समोर आली.

भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या शिगेला पोहोचणार?
X

मुंबई // भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकारामुळे दररोज रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. 1 जानेवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात कोरोनाची 22,775 नवीन प्रकरणे समोर आली. ही 6 ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आता देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली असून यासोबतच कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटची 161 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ओमिक्रॉनबाधित एकूण रुग्णांची संख्या 1431 वर पोहोचली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की, महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमिक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे. तर तज्ज्ञांच्या मते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शिगेला पोहोचेल आणि त्या काळात दररोज रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

2 डिसेंबर रोजी देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची पहिली दोन प्रकरणे समोर आल्यापासून आरोग्य मंत्रालय एका मिशन मोडमध्ये काम करत आहे. 15 डिसेंबरच्या आसपास दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 6000 होती, मात्र आता अचानक संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केलं आहे.

दरम्यान , कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची मते भिन्न आहेत. जेव्हा NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांना साथीच्या रोगाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवर प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की, किती लोकांना लसीकरण केलं गेलं आहे यावर ते अवलंबून आहे. सध्याच्या काळात लसीकरण हा संसर्ग टाळण्यासाठी सर्वात खात्रीचा मार्ग आहे. मात्र, यासोबतच त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यावरही भर दिला. तर काही विशेषतज्ञांचं असं म्हणणं आहे की नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ तर होईल, मात्र हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत जास्त गंभीर नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे, की भारतात कोविड-19 महामारीची तिसरी लाट 3 फेब्रुवारीपर्यंत शिगेला पोहोचू शकते. हा अंदाज या गृहितकावर आधारित आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

Updated : 2 Jan 2022 7:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top