उद्धव साहेब, राडा घालणाऱ्या शिवसैनिकांना थोडं इकडेही पाठवा
X
औरंगाबाद: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख जसा-जसा खाली जात आहे, तसा लसीकरणाचा वेग मंदावत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी लसी पडून आहेत, मात्र नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याची परिस्थिती आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 35 हजार लसी पडून आहेत.
गेल्या महिन्यात लस मिळावी म्हणून लोकं रुग्णालयाबाहेर सकाळपासून लाइन लावून उभे राहत असल्याचं चित्र होतं. तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लसीकरण मोहीम राबवण्याची वेळ आली होती. बीड जिल्ह्यात तर लाठीचार्ज करावा लागला होता. मात्र आता त्याच लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
राज्यात गुरुवारी दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात दिवसाला 4 लाख लोकांना लस दिली जात होती. त्यामुळे राज्यात लसीकरण मोहीम मंदावली असून, सरकार जनजागृती करण्यास कमी पडत असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे राम मंदिराच्या मुद्यावरून रस्त्यावर उतरून राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, याच शिवसैनिकांना लसीकरणाच्या जनजागृती साठी सुद्धा रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करावं, जेणेकरून ते जनजागृतीही करतील आणि लोकांचं लसीकरणही करून घेतील.