पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार ? फडणवीसांसोबत गुप्त भेट!
X
राज्यसभा निवडणुकी जवळ येत असताना राज्यातील राजकारणात घडामोडींनी वेग आला आहे. निवडणुकीच्या तयारीला सर्वपक्षांनी सुरुवात केली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठीही (Rajyasabha Election) हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यात काल गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेच तिकीट दिलं जाणार का ? यापार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला ला उधाण आलं आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीवरून ही भेट झाल्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्याशी ही गुप्त भेट झाली. राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे.
पंकजा मुंडे सध्या केंद्रात पक्ष संघटनेचे काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांचीही राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी ही भेट झाली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नावांची चाचपणी सुरू आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.