ललित पाटील प्रकरणी नार्को टेस्ट करणारं का ? आमदार सचिन अहिर
X
Nagpur : ललित पाटील प्रकरणी डॉ. देवकाते आणि संजीव ठाकूर त्यांची नार्को टेस्ट करणार का ? हे प्रकरण सीबीआयला देणार का ? अटक करणार की करणार नाही ? शिवसेना विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी सभागृहामध्ये उपस्थित केले होते. या गोष्टी सभागृहात सांगता येणार नाही. असे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य ते काम केलं नाही हे सत्य आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांना निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या पोलिसांकडून हा हलगर्जीपणा करण्यात आला. अशा पोलिसांना कलम 311 नुसार बडतर्फ करण्यात आल आहे. अशी माहिती देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेमध्ये बोलताना दिली.
ललित पाटील प्रकरणी काल विधान परिषदेमध्ये चर्चासत्र चालू असताना. ललित पाटील प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आरोपीला ठेवण्यासाठी परडे पैसे घेतले जातात. हॉस्पिटलमध्ये हे असे सगळे धंदे चालू आहेत. परडेचा बिजनेस चालू केला आहे का? असे सवाल आमदार अनिल परब यांनी देखील उपस्थित केले होते.