ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी दिले :प्रताप सरनाईक
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची आज अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मार्फत जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने प्रताप सरनाईक यांना दोन वेळा समन्स बजावला होता. त्यानंतर आज गुरूवारी या चौकशीसाठी प्रत्यक्षात ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. आज दिवसभरात जवळपास सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली.
X
या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यापुढच्या तपासासाठी मी स्वतः हजर राहण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका ईडीकडे मांडली आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी भविष्यात बोलावले तरीही मी कोणत्याही समन्स किंवा नोटीशीशिवाय हजर होईन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. टॉप्स ग्रुप्समध्ये कोणताही घोटाळा झाला असेल तर लोकांपुढे यायला हवा असेही त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सांगितले. या घोटाळ्यातील सतत्या लोकांसमोर यायला हवी म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून मागणी केली आहे. तसेच सरनाईक कुटुंबीय म्हणून यापुढेही सर्व सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची आज अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मार्फत जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने प्रताप सरनाईक यांना दोन वेळा समन्स बजावला होता. त्यानंतर आज गुरूवारी या चौकशीसाठी प्रत्यक्षात ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. आज दिवसभरात जवळपास सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी बोलावलेल नाही. ज्यावेळी बोलावतील समन्स न पाठवता नुसत्या ईमेल केला तरीही दोन तासात हजर होईन असे मी सांगितले आहे. समाधान होईपर्यंत मी या तपासात सहकार्य करेन, नोटीस द्यायची गरज नाही असेही मी ईडीला विनंतीत सांगितले आहे. सरनाईक कुटुंबीयांची गेल्या तीस वर्षापासून समाजात वेगळी छाप, वेगळ स्थान आहे. त्यामुळे सरनाईक परिवाराच्या विश्वासाहर्तेला तडा जायला नको असेही मी त्यांना सांगितले आहे.
ईडी ही देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे त्यामुळे असा काही घोटाळा झालेला असेल तर त्याचा तपास होणं गरजेचं आहेच. यापुढेही ईडी जेंव्हा बोलावेल तेंव्हा मी पूर्ण सहकार्य करेन. आजच्या चौकशीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला राजकारण, बिझनेस आणि इतर अनेक विषयावर प्रश्न केले. अतिशय चांगल्या पद्धतीने ईडीचे अधिकारी माझ्याशी वागले आहेत. चौकशीतल्या प्रत्येक गोष्टीच्या पुर्ततेसाठी मी ईडीसोबत असणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.