Home > News Update > भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार - लोंढे

भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार - लोंढे

भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार -  लोंढे
X

नागपूर// भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात असं म्हणत सोमय्या यांच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

यावेळी अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करण्यात येणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून 1 रुपयाचा दावा दाखल करणार आहे.

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहे. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याने, या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दीडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे, असेही लोंढे म्हणाले.

सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. काल एका टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर वसुलीचा आरोप केला. केलेल्या आरोपाचे सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. याबाबत व्हीडिओ पुरावा पोलीस आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितले. काँग्रेसनं ॲड. सतीश उके यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे.

Updated : 4 Nov 2021 6:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top