मुंबईतील सर्व दुकाने सुरू राहणार की नाहीत?
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना 15 जून पर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवणार असल्याचं सांगितलं. मात्र, या काळात ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. म्हणजे राज्यात सर्वत्र एकसारखा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही.
त्यामुळे ज्या भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या भागात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
मुंबईत काय आहे परिस्थिती...
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका ज्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकेतील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) अशा ठिकाणी
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.
मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
वरील नियमानुसार मुंबईत काही ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार अत्याआवश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने आठवड्यातून पाच दिवस आलटून पालटून सुरू ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.
त्यानुसार अत्यावश्यक असणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत आणि बिगर अत्यावश्यक दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील.
ई-कॉमर्सच्या अंतर्गत येणाऱ्या वस्तुंच्या वितरणास नवीन नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे.