Home > News Update > आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का?

आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का?

आमदार सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल

आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का?
X

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यात लाखो विद्यार्थ्यानाची आधारकार्ड वैध नसल्याचे आढळले आहेत का? आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का? असा प्रश्‍न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील व अन्य सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नानुसार विधान परिषदेत संच मान्यतेसंदर्भात चर्चा झाली. आधार पडताळणीमध्ये लाखो विद्यार्थ्यांची आधारकार्ड वैध ठरत नसल्याने संच मान्यता प्रलंबित असून शिक्षक भरतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी चुकीच्या संच मान्यतेमुळे अनेक शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. शिक्षण हक्क कायदा तरतुदिचा चुकीचा अर्थ लावून अतिरिक्त ठरलेल्या १७ हजार शिक्षकांच्या समायोजन पूर्ण झाले नसल्याबाबत आमदार पाटील यानी प्रश्न उपस्थित केले.

यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी, आधारकार्ड पडताळणी करत असताना आलेल्या तांत्रिक अडचणीसंदर्भात उपाययोजना केल्या आहेत. शाळेच्या पटावर असलेले विद्यार्थी वैध करण्याची प्रक्रिया सुरु आहे. संच मान्यतेतील त्रुटी दूर करून सुधारित करण्याची कार्यवाही सुरु असून कृत्रिमरीत्या शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. ९१ टक्के विद्यार्थ्याची पडताळणी करण्यात आली आहे. मात्र आधार पडताळणीच्या कारणाने विद्यार्थ्याना प्रवेश किवा लाभापासून वंचित ठेवलेले नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Updated : 19 July 2023 6:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top