Home > News Update > शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन का पाळले नाही ? उपराष्ट्रपती धनकडं यांचा केंद्राला सवाल

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन का पाळले नाही ? उपराष्ट्रपती धनकडं यांचा केंद्राला सवाल

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन का पाळले नाही ? उपराष्ट्रपती धनकडं यांचा केंद्राला सवाल
X

शेतकऱ्यांना काय वचन दिले होते ? दिलेले आश्वासन का पाळले नाही ? वचन पाळण्यासाठी आपण काय करत आहोत ? गेल्या वर्षीही आंदोलन झाले होते, यंदाही आंदोलन आहे. काळाचे चक्र फिरत आहे. आम्ही काहीच करत नाही. असे थेट सवाल भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनकडं यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहॆ यावेळी केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.

मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन कॉटन टेक्नॉलॉजीच्या (सीआयआरसीओटी) शताब्दी सोहळ्यात उपराष्ट्रपती धनखड यांनी सरकारला खडे बोल सुनावले यावेळी केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान हे उपस्थित असल्याने

उपराष्ट्रपती, जगदीप धनखड यांनी मंगळवारी थेट कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रश्नांचा भडिमार केला. शिवराज यांच्याकडे बोट दाखवत ते म्हणाले, कृषिमंत्री, तुमचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. भारतीय राज्यघटनेत दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती तुम्हाला विनंती करत आहे की कृपया मला सांगा की शेतकऱ्यांना काय वचन दिले होते? दिलेले आश्वासन का पाळले नाही? वचन पाळण्यासाठी आपण काय करत आहोत? गेल्या वर्षीही आंदोलन झाले होते, यंदाही आंदोलन आहे. काळाचे चक्र फिरत आहे. आम्ही काहीच करत नाही.

शेतकरी अडचणीत असून आंदोलनाचा मार्ग अवलंबत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही परिस्थिती देशाच्या सर्वांगीण हितासाठी चांगली नाही, असंही धनकडं सांगायला विसरले नाहीत.

उपराष्ट्रपती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादातूनच तोडगा निघू शकतो असा संदेश जगाला दिला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न आठपटीने वाढवावे लागेल. त्यातील बहुतांश भाग ग्रामीण आहॆ ही जाणीवही करून दिली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भारत शेतकऱ्यांशिवाय समृद्ध देश होऊ शकत नाही. आजही शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा त्यांचा आत्मा आहे. असं चौहान यांनी म्हटलं आहॆ.

उपराष्ट्रपती धनकडं यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार किती गांभीर्याने घेते याकडे शेतकऱ्यांच् लक्ष लागून आहॆ.

Updated : 4 Dec 2024 4:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top