मॅक्स महाराष्ट्रची युनोच्या बैठकीत चर्चा का झाली ?
X
Max Maharashtra या डिजिटल माध्यमानं मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या घटना, शोषित, पीडित, वंचितांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना असो की इथल्या यंत्रणांना सातत्यानं प्रश्न विचारणं असो मॅक्स महाराष्ट्रनं पत्रकारितेशी कधीही तडजोड केली नाही. मात्र, तरीही मॅक्स महाराष्ट्रच्या Youtube चॅनेलवरून काही महत्त्वाचे व्हिडिओ अचानक डिलिट होत आहेत. यासंदर्भात Youtube कडून कुठलीही समाधानकारक उत्तरं मिळालेली नाही. व्हिडिओ डिलिट होण्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. मॅक्स महाराष्ट्रचे व्हिडिओ डिलिट करण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अर्थात युनोच्या परिषदेत उपस्थित कऱण्यात आलाय.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवी हक्क परिषदेत ॲड. संघर्ष आपटे यांनी यासंदर्भात आवाज उठवलाय. कट्टरतावादावर या परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. भीमा-कोरेगाव इथं २०१८ मध्ये मनोहर भिडे याने चिथावणीखोर भाषण केल्यानं दोन समूहात तणाव निर्माण झाला होता. यात एका समूहानं तिथं अभिवादनासाठी आलेल्या दलित समुदायातील जनतेवर दगडफेक केली होती. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने प्रत्यक्ष घटनास्थळावरून रिपोर्टिंग केलं होतं. या घटनेनंतर काही दिवसांनी मॅक्स महाराष्ट्रचे भीमा-कोरेगाव आणि मनोहर भिडे याच्याविषयीचे व्हिडिओ हळूहळू डिलिट करण्यात आले. ही एकप्रकारे माध्यमांची मुस्कटदाबी असून संविधानानं इथल्या नागरिकांना बोलण्याचं, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलंय, त्याचंही उल्लंघन होत असल्याचं ॲड. संघर्ष आपटे यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. कुठलंही तार्किक कारण न देता मॅक्स महाराष्ट्रचे व्हिडिओ डिलिट करण्यात येत असल्याचं त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिलं.
संयुक्त राष्ट्र संघटनेनं भारत सरकारशी तात्काळ संपर्क साधून मनोहर भिडे सारख्या कट्टरतावादी लोकांविरोधात कारवाई करण्याची मागणी ॲड. संघर्ष आपटे यांनी यावेळी केली.
प्रेक्षकहो तुम्हीच सांगा ‘हे’ व्हिडिओ डिलिट करण्यासारखे होते का ?
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, आंदोलन करणं हा मूलभूत अधिकार यावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेलं विश्लेषण, मॅक्स महाराष्ट्रचं युट्युब चॅनेल हॅक करणाऱ्या हॅकर्सना शिक्षा कधी होणार ? ओबीसी जनगणनेवरून केंद्र सरकारच्या विरोधात बीडमध्ये समता परिषदेचे आंदोलन, दिल्लीच्या सर्व सीमा बंद करा – अरविंद केजरीवाल, अर्थसंकल्पातून कोकणच्या वाट्याला काय ? नारायण राणे मराठा तरूण आंदोलकांच्या भेटीसाठी आझाद मैदानामध्ये, अमित शहा राजीनामा द्या – सुप्रिया सुळे, सीएए संदर्भात काय आहे देशभरातील सद्यस्थिती ? सांगताहेत बी.जी. कोळसे-पाटील, राज्य विधानपरिषद अर्थसंकल्पीय अधिवेशन, मूलभूत हक्कांचा लढा सफल केल्यावर आता ‘ललिता’तल्या ललित ची जुळली लग्नगाठ ! , कधी थांबेल शेतकरी आत्महत्या ? जिनांच्या मानसिकतेचे लोक अजूनही भारतात आहेत – जावेद अख्तर, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी भीमा-कोरेगावमध्ये वेगळं वातावरण तयार केलं – शरद पवार, ... आणि त्या वळूची देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने वाटचाल, शिवनेरी-शिवजन्मोत्सव – अजित पवार अशा पद्धतीचे कुठलाही युट्युबच्या गाईड लाईन्सचं उल्लंघन न करणाऱे व्हिडिओ देखील युट्युबनं डिलिट केले आहेत.