Home > News Update > शिवसेनेच्या आमदाराने स्वत:च्या सरकारच्या विरोधात आंदोलन का केलं? भाजपचा सवाल

शिवसेनेच्या आमदाराने स्वत:च्या सरकारच्या विरोधात आंदोलन का केलं? भाजपचा सवाल

शिवसेनेच्या आमदाराने स्वत:च्या सरकारच्या विरोधात आंदोलन का केलं? भाजपचा सवाल
X

पाचोरा-भडगाव विधानसभा चे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी थेट ठाकरे सरकारला घरचा आहेर देत महावितरण विरोधात ताळाठोको आंदोलन केले. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी संदर्भात स्वतः सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु असताना भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमदार किशोर पाटील फक्त नौटंकीबाज माणूस असून त्यांनी आता हा नौटंकीबाजपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, राज्यात सत्ता त्यांची आहे. मुख्यमंत्री त्यांचे पक्षाचे आहेत. ऊर्जामंत्री यांच्या महाविकास आघाडीचे आहेत. ते स्वतः आमदार आहेत. हे ते विसरून गेले आहेत का? जर त्यांना खरंच शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आहे. तर त्यांनी मुख्यमंत्री अथवा ऊर्जामंत्र्यांकडून तसा आदेश आणुन शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, पण ते फक्त आंदोलनाची नौटंकी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

तसेच जनतेने नाकारलेल्या नेतृत्वाची पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याने उसने अवसान आणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता, तसेच जिल्हा पक्ष संघटनेत विनवण्याकरून सुद्धा आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले गेले नाही. म्हणुन शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून स्वतःच्या सरकार विरोधात आंदोलन करून पक्षश्रेष्टीचे लक्ष वेधून घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आमदारांकडून केला जात आहे.

परंतु शेतकरी बांधव यांचा नाटकीपणा चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे आंदोलनाला कार्यकर्त्यांपेक्षा पोलीसांचीच संख्या जास्त होती, आणि ह्या महाशयांनी स्वतःला अटक झाल्याचे दाखवून पोलीस स्टेशनला जाऊन अधिकाऱ्यांच्या दालनात ए.सी.मध्ये बसुन चहापान केला याला कुठली अटक म्हणायची हा तर फक्त नाटकीपणा आहे.

तसेच मागील काळात ऐन रब्बी हंगामात कृषी पंपाचे ट्रांसफार्मर मोठ्या प्रमाणात खराब होत होते. ते दुरुस्तीसाठी लागणारे ऑइल व इतर सामग्री अभावी ट्रांसफार्मर महिना-महिनाभर दुरुस्त करून मिळत नव्हते, त्यातच ह्या जुलमी ठाकरे सरकारने थकीत वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन व त्यासोबतच लॉकडॉऊनमुळे वीजबिल न भरू शकलेले घरगुती वीज कनेक्शन देखील तोडण्याचा आदेश काढला आणि वीजबील भरत नाहीत. तोवर कनेक्शन जोडणी होणार नाही. असा सज्जड दम महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या वेळी शेतकऱ्यांना दिला होता.

अशा या बिकट परिस्थितीत तालुक्यांतील शेतकरी पूर्णपणे होरपळुन गेले असताना भारतीय जनता पार्टीने महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांची वेळोवेळी संपर्क करून तसेच निवेदने देऊन हा विषय मार्गी लावला होता. त्यावेळी हे नौटंकी बाज आमदार महोदय कुठेच दिसले नाहीत. असे शिंदे यांनी सांगितले.

Updated : 8 Jun 2021 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top