Home > News Update > शिवसेनेत दोनच पुरुष आहेत का?शिवसेनेच्या एका कार्यकर्तीची कैफियत

शिवसेनेत दोनच पुरुष आहेत का?शिवसेनेच्या एका कार्यकर्तीची कैफियत

शिवसेनेत दोनच पुरुष आहेत का?शिवसेनेच्या एका कार्यकर्तीची कैफियत
X

सेक्सची मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते गप्प का?असा सवाल शिवसेनेचीच कार्यकर्ती असलेल्या अयोध्या पोळ यांनी केला आहे. त्यांची ट्वीटरवरील पोस्ट जशीच्या तशी देत आहोत. "#महाढोंगीपणा #पटतंयकाबघा मी नेहमीच स्पष्ट, परखड व समोरच्याला आरसा दाखवणारे बोलते-लिहीते. आज पोस्टमधील काही शब्द वाचून जगापुढे सोज्वळ बनून वागणारे पण लपून छपून काळेधंदे करणारे आक्षेप नक्कीच घेतील व स्वतःच्या समर्थक गटात याची कुजबुज देखील करतील. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एका पुरुष पदाधिकारीने माझ्या पोस्टवर "रांडला निरोध लावून झवण्याची प्रमीशन दिल्याबद्दल धन्यवाद" अशी कमेंट केली, मी त्याला त्यावर जाब विचारला तर तो अश्लील कमेंट करणारा बरोबर ठरल्या गेला व मी जाब विचारला तर मी चुकीची ठरवले गेले.

वा रे वा तुमची बुद्धी. सदरील प्रकरणावर सोशल मीडियावर पक्षप्रमुखांना प्रश्न उपस्थित केला (अर्थात मला तशी त्यांनी माझे मत व प्रश्न मांडायची परवानगी दिलेली आहे) म्हणून मला माझ्याच सहकाऱ्यांनी चुकीचे ठरवले व माझ्या विरोधात पुरुषांनीच नव्हे तर महिलांनी देखील "मुख्यमंत्री साहेबांची नामुष्की अयोध्याने केली", "पक्षाच्या वरिष्ठांना सांगायचे होते", "हीला खूप घमंड आहे", "हीला बढाया मारून घेऊ दे" वगैरे वगैरे अशा अनेक पोस्ट केल्या.

बरं मग मी पोस्ट का केली म्हणून मला एका तरी महिला पदाधिकारी किंवा वरिष्ठ महिला पदाधिकारीने विचारले का? "अयोध्या का गं अशी पोस्ट केली" व "अयोध्याजी कशा आहात? पोस्ट वाचली तुमची, कसे काय एकदमच इतक्या परखडपणे पोस्ट केली? काय पार्श्वभूमी यामागची"? असे मला अनुक्रमे #शिवसेना उपनेते तथा अध्यक्ष स्थायी समिती श्री यशवंतजी जाधव साहेब व विधानसभा संघटक श्री विजय(दाऊ) लिपारे जी यांनी फोन करून विचारणा केली, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त दोनच पुरुष संवेदनशील आहेत का? फक्त या दोनच पुरुषांना चुक की बरोबर जाणून घ्यायचे होते का? संघटना फक्त या दोनच पुरुषांची आहे का? ज्या पक्षाला "शिवसेना परिवार" म्हणता त्या परिवारात फक्त यशवंत जाधव व विजय लिपारे हे दोघेच आहेत का? असो अजून बरेच प्रश्न आहेत...... आज सकाळी TV9 मराठीची बातमी वाचली की एका शिवसेना विभागप्रमुखाने एका महिलेला "आयटम चाहिए" म्हणत "सेक्स"ची मागणी केली म्हणे त्यावरून त्या महिलेने विभागप्रमुखाला चोपले, आज समाज माध्यमावर बातमी पसरत आहे तर मग आज पक्षप्रमुखांची नामुष्की होत नाही का? आज आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब #मुख्यमंत्री नाहीत का? ज्या 300-350 पदाधिकारींने माझ्या विरोधात पोस्ट केल्या ते आज सेक्सची मागणी करणाऱ्या #विकृत विभागप्रमुखाच्या विरोधात पोस्ट करताना का दिसत नाहीत? हा #महाढोंगीपणा योग्य वाटतो का तुम्हाला? माझ्या बाबतीत जे झाले ते 6 डिसेंबर 2021 रोजी सर्व पुराव्यानिशी आदरणीय मंत्री

श्री आदित्यजी ठाकरे साहेबांच्या A6 या शासकीय बंगल्यावर वरिष्ठांसमोर मांडले, माझ्या वरिष्ठांनी मी बरोबर आहे व योग्य केले हेच सांगितले बाकी लोकांनी मला चुक ठरवले. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. जे माझ्यासोबत झाले त्यासाठी आवाज उठवायला व लढायला मी खंबीर आहे, देव न करो पण कधी कुठल्याही महिलेबरोबर जर चुकीचे झाले व ते माझ्या निदर्शनास आले तर तिच्यासाठी उभी राहायची देखील हिंमत ठेवते. समोर आल्यावर गोड बोलून पाठ फिरवली की खंजीर खुपसणारे लोक असतात, अयोध्या तशातली नाही.

#रोखठोक"



या शब्दात अयोध्या पोळ यांनी आपली कैफियत मांडली आहे. आता तरी शिवसेनेचे नेते त्यांचे म्हणणे समजून घेणार का हा प्रश्न आहे.

Updated : 6 Sept 2022 12:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top