सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना का झापले?
X
'जिनके घर शीशे के होते हैं, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते' अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका नाकारली. गेल्या काही दिवसांपासून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.
या सगळे आरोप होत असताना परमबीर सिंह यांच्या विरोधात असलेल्या जुन्या केसचा तपास महाराष्ट्र पोलिस करत आहे. या प्रकरणात परमबीर सिंह यांनी सेवा काळात अधिकाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोप पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केला आहे. या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर राज्य पोलिस आता चौकशी करत आहे. ही चौकशी राज्याबाहेरील तपास यंत्रणांनी करावी. अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने ती नाकारल्यानंतर परमबीर सिंह यांच्या वकिलाने आपण ही याचिका परत घेत असल्याचं न्यायालयात म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वकील महेश जेठमलानी यांना सवाल करत 30 वर्ष महाराष्ट्र पोलिसांची सेवा केली तरीही तुमचा राज्य पोलिसांवर तुमचा भरोसा का नाही? ही विचित्र गोष्ट आहे. असा थेट सवाल केला होता.
नक्की हे प्रकरण काय आहे? न्यायालयाने परमबीर सिंह यांना का झापलं? काय घडलं न्यायालयात या संदर्भात Adv. सतीश तळेकर आणि Adv. गणेश घोलप यांच्याशी चर्चा केली आहे. किरण सोनवणे यांनी