Home > News Update > वाढत्या असहिष्णुतेवर मोदी गप्प का, IIMच्या विद्यार्थी-प्राध्यपकांचा सवाल

वाढत्या असहिष्णुतेवर मोदी गप्प का, IIMच्या विद्यार्थी-प्राध्यपकांचा सवाल

वाढत्या असहिष्णुतेवर मोदी गप्प का, IIMच्या विद्यार्थी-प्राध्यपकांचा सवाल
X

नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढत आहे, अशी टीका कायम होत असते. याच मुद्द्यावरुन राजकारणी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप देखील करत असतात. पण आता या सामाजिक असहिष्णुतेवर देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या IIM म्हणजेज Indian Institute of Management चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आवाज उठवला आहे. त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे आणि मोदींनी यावर मौन का धारण केले आहे, असा सवाल देखील उपस्थित केला आहे. IIMच्या बंगळुरू आणि अहमदाबाद मधील इन्स्टिट्युटमधील काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे एकत्रित पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. देशात वाढत असलेल्या सामाजिक असहिष्णुतेविषयी त्यांनी खेद व्यक्त केला आहे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासर्व घटनांवर मौन बाळगल्याने त्यांनी निराशादेखील व्यक्त केली आहे.

त्यांनी या पत्रात काय म्हटले ते पाहूया, देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या घटनांबद्दल पंतप्रधांचे मौन हे सगळ्यांसाठी निराशाजनक आहे. देशाच्या बहुरुपी संस्कृतीला आमच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. पण पंतप्रधानांच्या मौनामुळे द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना अधिक ताकद मिळते आहे. यामुळे देशाचे ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे, या भाषेत या विद्यार्थी आणि पालकांनी आपली भूमिका मांडली आहे.

देशात गेल्या काही दिवसात धर्मसंसदेत झालेली प्रक्षोभक भाषणं, मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न, सुल्ली डील, बुल्ली बाईसारखे एप्स या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आधीच केंद्र सरकार आणि भाजप टार्गेट होत असताना आता IIMसारख्या संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक नाराजी व्यक्त करत असतील तर ही गंभीर बाब आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी चर्चा केल्याचे वृत्त दिले आहे. त्यानुसार द्वेष पसरवणाऱ्यांचा आवाज जास्त असेल त्याविरोधातील आवाजही त्यांच्यापेक्षा जास्त असला पाहिजे, पण मौन हा काही यावरील उपाय असू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Updated : 8 Jan 2022 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top