शरद पवारांना विश्वासात का घेतलं नाही, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
X
अजित पवार यांनी आपली भूमिका शरद पवार यांना सांगितलं होतं असं ते वारंवार बोलतायत. शरद पवार यांना हे माहित होतं की नव्हतं. पडद्यामागे नेमकं काय झालं हे मी योग्य वेळ आल्यावर सांगेन असं देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
शिवसेना आणि इतर पक्षांचं साटंलोटं आधीपासून होतं. काही काळानंतर हे सर्व समोर येईलच. हे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली येणार म्हणून भाजपाला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. निश्चितच जनादेशाचा अपमान झालाय.
उध्दव ठाकरे आणि माझ्यात काल पुण्यात थोड्या गप्पा झाल्या. आमची मैत्री संपलेली नाही. राजकीय दृष्ट्या त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली असली तरी मैत्री कायम आहे. मला जी भूमिका मिळालीय ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असं देवेंद्र फडणवीस यांनी आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हे ही वाचा
गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं – एकनाथ खडसे
हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेनं उन्नाव पीडितेची हेडलाईन मॅनेज केली काय?
भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु…
महाराष्ट्रातले मोठे प्रोजेक्ट रद्द करण्याचा किंवा त्यांचा पुनर्विचार करण्याचा धडाका सरकारने लावलाय. हे जर असंच चित्र राहिलं तर मग आपल्या राज्याची पत खाली घसरणार आहे. अनेक देशांनी अतिशय कमी टक्क्यांनी राज्याच्या विकासकामांना कर्ज दिलं आहे. ते परत जाऊ शकतात. त्याचा विपरित परिणाम रोजगार तसंच इतर विकास कामांवर होणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सिमेंट, लोखंड भारतातल्या कंपन्याकडून घेतलं जाणार आहे. त्यातून अप्रत्यक्ष रोजगार ही निर्माण होणार आहे. जापान सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्ज देत आहे. जापान तुम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी कर्ज देणार आहे का याचा ही विचार केला पाहिजे. आम्ही सरकार मध्ये आल्यानंतर आम्ही पॉलिसी बदलल्या नाही. जिथल्या पॉलिसी सरकार आल्यानंतर बदलतात तिथे गुंतवणुकदार येत नाहीत. सरकार बदलणं ही प्रक्रीया आहे. सरकार बदलल्यावर सुरू विकास कामांना स्थगिती देणं योग्य नाही. असं ही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.