Home > News Update > कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही ?

कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही ?

डिआरडिओ (DRDO) संचालक आणि संघ स्वयंसेवक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिलेला देशाची अनेक संरक्षण विषयक गुपिते शेयर केली. मात्र अजूनही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला जात नाही ?असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विधानसभेत उपस्थित केला.

कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही ?
X

प्रदीप कुरुलकर हा काही साधा अधिकारी नाही,अणू परीक्षण करताना जे 15 प्रमुख अधिकारी उपस्थित होते त्यात एक कुरुलकर होते.त्यामुळे त्याचा अपराध पण मोठा आणि गंभीर आहे, जारा नावाची पाकिस्थानी महिला त्यांच्या संपर्कात होती,हे दोघे प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी एकत्र एक क्रिकेट सामना सुद्धा बघितला अशी माझी माहिती आहे. देशाची संरक्षण विषयक गुपीते शत्रू देशाला पुरवणे हा देशद्रोह सरकारला वाटत नाही का ? केवळ ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट सारखे इतर गुन्हे दाखल करणे आणि त्याचा तपास महाराष्ट्र एटीएस कडून करणे ही बाब योग्य वाटत नाही , त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. या मागणीला दुजोरा देत सभागृहात आमदार जयंत पाटील यांनी आपण उठलो सुटलं. कोणावरही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतो ?मग कुरुलकर अपवाद कशासाठी त्याच्यावर फक्त ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट lचा गुन्हा दाखल केला, याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. कुरुलकरची केस कोर्टात सुरू असताना या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही असं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही चर्चा थांबवली.

प्रदीप कुरूलकरच्या इंटरनॅशनल लिक आणि सामाजिक संस्थेची संपर्क तपासून पहा, असे पृथ्वीराज चव्हाण वारंवार सांगत असतानाही विधानसभा अध्यक्षांनी ही चर्चा सभागृहात होऊ देणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित असतानाही यावर चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. नेमकं या देश दोघांना कोण वाचवते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.. पहा आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर...

Updated : 3 Aug 2023 6:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top