साहित्यामधील राजकारणावर चर्चा का नाही? सुचिता खल्लाळ यांचा परखड सवाल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Dec 2021 6:29 PM IST
X
X
लेखनाची गुणवत्ता ही लेखकाची लोकप्रियतेवर आणि त्याला मिळालेल्या पुरस्कारांच्या संख्येचा विचार करुन ठरवले जाते, अशी खंत कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनातील लक्ष्यवेधी कवींशी संवाद या परिसंवादात त्या बोलत होत्या. काही प्रकाशन संस्था सोशल मीडियाचा वापर करुन लेखकाला प्रसिद्धी मिळवून देतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. आपल्या देशात सर्वप्रकारच्या राजकारणावर चर्चा होते, पण साहित्यामधील राजकारणावर टीका होत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Updated : 4 Dec 2021 6:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire