ईडीने का कारवाई केली मला माहित नाही: प्रताप सरनाईक यांची परदेशातून येताच प्रतिक्रिया
X
सकाळी ईडीने छापा मारून शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा कार्यालय आणि घरांमध्ये शोध मोहीम केल्यानंतर मुलगा विहंग याला एक ताब्यात घेतले परदेशातून येतात सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ईडीने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतलं, याची माहिती मीदेखील अजून घेत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. परदेशातून आल्यानंतर सरनाईक यांनी 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात साधारण दीड तास चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई केली.