Home > News Update > राहुल गांधींबद्दल वक्तव्य करणाऱ्या दानवेंविरोधात कॉंग्रेस शांत का ?

राहुल गांधींबद्दल वक्तव्य करणाऱ्या दानवेंविरोधात कॉंग्रेस शांत का ?

राहुल गांधींबद्दल वक्तव्य करणाऱ्या दानवेंविरोधात कॉंग्रेस शांत का ?
X

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना राज्यभरात आक्रमक भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या विरोधात असंच काही विधान करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( raosaheb danve) यांच्याविरोधात काँग्रेसने शांत राहण्याची भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे.

राणे यांनी ठाकरेंबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यात आता त्याचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. तर शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभरात आंदोलन सुरू केली आहेत.

असं असताना काँग्रेसने मात्र राहुल गांधींना 'सांड बैल' म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मवाळ भूमिका घेणं पसंद केलं आहे. एखादं दुसरा नेता सोडला तर दानवेंवर टीका सुद्धा काँग्रेसमधून झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसचा संयमीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय म्हणाले होते दानवे?

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( raosaheb danve) यांनी काँग्रेसचे ( Congress ) खासदार आणि नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यावर टीका करताना राहुल गांधींना चक्क 'देवाला सोडलेला सांड' असे म्हंटलं होतं.

Updated : 24 Aug 2021 1:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top