इंधनदरवाढीवर गोदी मिडीया शांत का?
X
एका बाजूला जगभर कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना सलग नवव्या दिवशी देशात इंधनदरवाढ सातत्याने सुरुच आहे. आज पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली आहे. देशात २२ मार्चपासून इंधनदरवाढीवर गोदी मिडीया शांत असून सोशल मिडीयावर सरकारविरोधी रोष आणि मीम्सचा महापुर आला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं सर्वसामन्यांच्या खिशाला चटके बसू लागले आहेत. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन महानगरांमध्ये पेट्रोल आधीच शंभरीपार गेले आहे. अन्य राज्यांतही फारशी वेगळी स्थिती नाही. गेल्या ९ दिवसांपासून आठव्यांदा इंधन दरवाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. आज बुधवारी पेट्रोल १०१.०१ रुपये प्रतिलीटर असून डिझेल ९२.२७ रुपये प्रतिलीटर आहे. देशातील अन्य चार प्रमुख शहरांपैकी मुंबईत पेट्रोल-डिझेलचा दर अधिक आहे.
याबाबत आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचे समर्थन करणाऱ्या गोदी मिडीया आणि त्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारले जात आहेत.
अनेक व्हिडीओ बनवून लोक मनातील भडास काढत आहेत.
युपी निवडणुकांनंतर ही तेलाच्या किंमती वाढणार नाहीत कारण मोदी सरकारने या परिस्थितीचा फायदा घेत रशियाकडून लाखो बॅरल तेल रूपयांच्या किंमतीत विकत घेतले असून त्यामुळे भारतात तेल स्वस्तच होणार आहे अशा अफवा संपादक प्रसाद काथेने पसरवण्यास सुरूवात केली.
त्यावरुन सोशल मिडीयात जोरदार ट्रोलिंग सुरु झाले आहे.
इंधनाच्या दरवाढीवरुन सर्वसामान्य माणुस पिचला जात असताना सोशल मिडीयावर मिम्सचे उधान आले आहे. यामधे प्रामुख्याने गोदीमिडीयाला टार्गेट करण्यात आले आहे.