Home > News Update > स्मृती इराणींनी श्रद्धांजलीचा मेसेज का केला डिलिट ?

स्मृती इराणींनी श्रद्धांजलीचा मेसेज का केला डिलिट ?

स्मृती इराणींनी श्रद्धांजलीचा मेसेज का केला डिलिट ?
X

IAS Smoking Skills नावाच्या अज्ञान ट्रोल अकाऊंटवरून जगभरातील मुस्लीमांच्या विरोधात द्वेषपूर्ण लिखाण केले जात होतो. हे अकाऊंट एक तिशीतला युवक चालवत होता, आणि त्याचा काल ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आली. या युवकाच्या मृत्यूवर थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मध्यरात्री १२.३६ ला ट्वीट करून शोक व्यक्त केला. गाझा पट्टीतील एका बालकाच्या तुटलेल्या दोन पायांच्या फोटोवर ‘एक्स्ट्रा पाव लाना’ अशी असंवेदनशील कमेंट असो नाहीतर पिडीत बालकाचा फोटो फेअर अँड लव्हली च्या जाहिरातीत जोडून आनंद व्यक्त करणे असो, समाजातील कुठल्याही वैचारिक भूमिका घेण्याऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आसुरी आनंदी व्यक्त करणे असो, IAS Smoking Skills या अकाऊंटवरून नेहमीच प्रक्षोभक ट्वीट टाकले जात असत.

समाजमाध्यमांवर अनामिक राहून द्वेष पसरवणाऱ्या असंख्य अकाऊंटना भारतीय जनता पक्ष उघड समर्थन देत असते. IAS Smoking Skills या अकाऊंटला लाखभरापेक्षा जास्त फॉलोअर्स होते, अनेक केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे वरिष्ठ नेते या अकाऊंट ला फॉलो करत होते. द्वेषपूर्ण लिखाण करताना कुठलाही विधिनिषेध न पाळणाऱ्या या अकाऊंट धारकाच्या मृत्यूबाबत अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शोक व्यक्त केल्यानंतर समाज माध्यमांवर ज्वलंत प्रतिक्रीया उमटल्या, त्यानंतर स्मृती इराणी यांनी आपलं ट्वीट डिलिट केले आहे, मात्र अजूनही अनेक भाजपा नेते आणि Influencers यांनी IAS Smoking Skills या अकाऊंट धारकाला श्रद्धांजली वाहण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे.

अवघ्या तिशीतल्या या ट्रोल युवकाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी कर्माचं फळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अल्ट न्यूज च्या झुबेर यांनी ही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केले आहे.

Updated : 30 Oct 2023 1:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top