Home > News Update > अश्रफ घनी यांनी देश का सोडला ?

अश्रफ घनी यांनी देश का सोडला ?

आंतराष्ट्रीय पातळीवर मोठी घडामोड म्हणजे 20 वर्षानंतर तालिबान्यांनी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे.राजधानी काबुलमधील राष्ट्रपती महल ताब्यात घेतल्यानंतर अफागाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पडले आहेत.घनी यांनी देशाबाहेर पळ काढल्यानंतर अफगाण नागरिकांनी नाराजी व्यक्त करत असताना अश्रफ घनी यांनी फेसबूक पोस्ट देश का सोडला याचं उत्तर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.

अश्रफ घनी यांनी देश का सोडला ?
X

अश्रफ घनी यांनी फेसबूक पोस्ट देश का सोडला याचं उत्तर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.


घनी हे सध्या त्यांच्या विश्वासू लोकांसाबात उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आश्रय घेतल्याचं सांगितलं जात आहे.सुरक्षेच्या दृष्टीनं घनी यांनी त्यांच्या सध्याच्या स्थानाची माहिती उघड केलेली नाही. त्यांची पत्नी, त्यांचे मुख्य कर्मचारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आहेत.

तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी देशातून पलायनं केलं, असं घनी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलेय. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये घनी म्हणालेत की, '20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आणून त्यांना कठीण निर्णयाचा सामना करावा लागला आहे. रक्तपात टाळण्यासाठी, मला वाटले की देश सोडणे योग्य वाटत आहे. '

अफगाणिस्तानात सध्या अनागोंदी सुरु आहे. अमेरिका आणि नाटो फौजा माघारी फिरल्यानंतर आठवडाभरातच तालिबान्यांनी एक एक शहर करत संपूर्ण अफगाणिस्तावर ताबा घेतला आहे. तालिबानी बंडखोरांनी इतर देशानाही धकमीवजा इशारा दिला आहे. काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनाही ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर गेले आहे.



आता कोणत्याही क्षणी तालिबानी अफगाणिस्तानर कब्जा केल्याची घोषणा करु शकतात. अन् लवकरच अफगाणिस्तानच्या नामांतराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानला पुन्हा 'इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान' (आयइए) असं तालिबानी जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अमेरिका आणि नाटो यांनी जवळपास 20 वर्ष अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही तालिबान्यांनी अवघ्या आठवडाभरात संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

Updated : 16 Aug 2021 11:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top