केनियाची जनता अदानी विरेाधात रस्त्यावर का ?
X
केनिया हा आफ़्रीकन खंडातील एक महत्वाचा प्रगत देश आहे. अनेक भारतीय विशेषकरून गुजराती व्यापारी आणि उद्योगपती मेाठया प्रमाणात अनेक वर्ष केनियात स्थिरावले आहेत .ज्योमेा केन्याटा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट विकसित करण्याचे कंत्राट केनिया सरकारने अदानी कंपनीला दिले आहे. संयुक्तपणे ते हे काम करणार आहेत . मात्र केनियाची राजधानी नैरेाबी या शहरात आता अदानी विरेाधात तेथील कामगार आणि राजकीय पक्ष संप आणि आंदेालन करत आहेत. त्यामुळे “अदानी गेा बॅंक “ “ किंग ॲाफ फ्रॉड “ अशा घेाषणा आता तिथे गाजत आहेत . माध्यमात पहिल्या पानांवर अदानी विरेाधांत बातम्या जगभर प्रसिद्ध हेात आहेत . यावर अदानी कंपनीने संतापाने एक प्रसिद्धी पत्र वितरीत केले आहे . आंदेालन करणाऱ्या कामगार संघटना आणि राजकीय पक्ष यांना आम्ही दिलेली लाच नावासहीत जाहीर करू अशी धमकी या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे . यासंदर्भात अर्थविषय आणि कामगार विषयांचे तज्ज्ञ विश्वास उटगी यांचं हे परखड भाष्य ऐका.