अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागीतलं होतं - शरद पवार
X
अजित पवारांनी भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला? याचं उत्तर आज स्वत: शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिलं आहे. पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांना अजित पवार यांच्या बाबत प्रश्न विचारला....
‘अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपलं जे ठरलं होतं, ते अडीच अडीच वर्षे असं ठरलं होतं, मला नंतर खोटं ठरवण्यात आलं. असा खुलासा करण्यात आला आहे.’
यावर शरद पवार काय म्हणाले?
‘कसं आहे अडीच वर्षांची मागणी होती. मागणी होती हे खरं आहे. त्याच्यात नाही एकवाक्यता झाली.’ असं म्हणत राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद न दिल्यानं अजित पवार बाहेर पडले का? अस सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
हे ही वाचा...
राणेजी, महाराष्ट्रात आमदारांचा बाजार भरला आहे का?
अजित पवार आणि भाजपा मध्ये नक्की डील काय झालंय…
कुठल्या पवारासोबत राष्ट्रवादीचे आमदार
दरम्यान सध्या राज्यात बहुमत प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष धडपड करत आहेत. या बहुमत स्थापनेच्या केंद्रबिंदूवर असणारे शरद पवार आज सातारा जिल्ह्यातील कराड इथं पोहोचले आहेत. आज राज्याचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन. यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय गुरु आहेत. त्यामुळे त्यांनी न चुकता आज प्रीतीसंगमावर यंशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला...
काय म्हणाले शरद पवार...
“एखाद्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. हे मत पक्षाच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यादृष्टीने वेगळी पाऊलं टाकली जाऊ शकतात. पण असे निर्णय व्यक्तिगत नसतात तर पक्षाचे असतात,”
“बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं, केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला,”
“ही निवड वैध आहे की नाही हा खरा प्रश्न असून राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील,”
“अशा अनेक गोष्टी मी गेल्या ५० ते ५२ वर्षात पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनता या अशा प्रसंगी भक्कम उभी राहते हा माझा गेल्या वर्षांपासून अनुभव. मला यासंबंधी चिंता वाटत नाही, अशा संकटांमधून मार्ग निघत असतो,”
“आम्ही सगळे पक्षासाठी काम करणारे नेते, कार्यकर्ते आहोत. त्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते आम्ही करु. आमच्याकडे नेत्यांची मोठी फळी आहे. माझ्या सूचनेचा पक्षात अनादर होणार नाही याची खात्री आहे,”