कुठे बिघडलं गणित?
X
काल महाआघाडीच्या बैठकीतून अजित पवार(Ajit pawar) अचानक बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बाहेर पडले. त्या अगोदर अजित पवार यांच्या बॉडी लॅग्वेजमध्ये बदल झाल्याचं अनेक नेत्याचं म्हणणं आहे. आणि त्या बैठकीतच अजित पवार यांचा मूड काहीतरी वेगळा लागलेला आहे. असं कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं.
काही न बोलताच अजित पवार तात्काळ तिथून निघून गेले. आणि तिथंच काहीतरी गणित बिघडलं होतं. आणि इथंच काही तरी गणित बिघडलं होत. ते कोणाच्या तरी संपर्कात होते. ते नवीन राजकीय गणित शिजवत होते. हे स्पष्ट झालं होतं.
उद्धव ठाकरे यांच्या नावाने सहमती दर्शवली. आणि त्याच पद्धतीने कॉंग्रेसनेही उद्धव ठाकरे 5 वर्षे मुख्यमंत्री राहतील. याला सहमती दर्शवली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणार नाही. ही बाब स्पष्ट झाली. अजित पवार अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. त्यामुळं नवीन राजकीय समीकरण तयार झालं असल्याचं बोललं जात आहे
दरम्यान राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात मोठी घडामोड घडली. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यानंतर सकाळीच शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली...
अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला.