Home > News Update > Covovax लसीसंदर्भात WHO चा मोठा निर्णय

Covovax लसीसंदर्भात WHO चा मोठा निर्णय

ओमिक्रॉन धोक्याच्या दरम्यान WHO ने सीरम इन्स्टिट्यूटची लस, Covovax ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अदार पूनावाला यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली

Covovax लसीसंदर्भात WHO चा मोठा निर्णय
X

नवी दिल्ली// कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर अली आहे. ओमिक्रॉन धोक्याच्या दरम्यान WHO ने सीरम इन्स्टिट्यूटची लस, Covovax ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अदार पूनावाला यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

अदार पूनावाला यांनी सांगितलं की, कोरोनाच्या लढाईत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Covovax लस अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे.

कोवोव्हॅक्स लस सिरमनं नोव्हावॅक्स कंपनीच्या सहकार्याने तयार केली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्यांमध्ये ही लस खूप प्रभावी ठरली आहे. त्यामुळे WHO ने आपत्कालीन वापरासाठी नवव्या लसीला परवानगी दिली आहे. WHO चं म्हणणं आहे की, कमी उत्पन्न असलेल्या देशांना या लसींचा खूप फायदा होईल आणि अल्पावधीत जलद लसीकरण होईल.

याबाबत, WHO च्या डॉ. मारिएंजेला सिमाओ यांनी म्हटले आहे की, नवीन व्हेरिएंटमध्ये लस हे एकमेव प्रभावी साधन आहे जे लोकांना गंभीर आजारांपासून वाचवू शकते. कमी उत्पन्न असलेल्या देशांत लसीकरणाची स्थिती सुधारण्यासाठी कोवोव्हॅक्स लसीचा परवानगी देण्यात आली आहे.

त्यांच्या मते, 41 देश असे आहेत जिथे 10 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण अजूनही सुरू आहे. तर 98 देश असेही समोर आले आहेत जिथे 40 टक्क्यांच्या आकड्याला स्पर्शही झालेला नाही.

आधी नोव्हावॅक्स-एसआयआयची ही लस इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. कोवोव्हॅक्स लस कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोवोव्हॅक्स लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवता येते. या लसीचे दोन डोस दिल्यावर त्याचा अधिक परिणाम होईल असं सीरमने म्हटले आहे. सीरमच्या या लसीला तेव्हाच हिरवा झेंडा दाखवण्यात आला जेव्हा याच्या फेज 2 आणि 3 च्या ट्रायलच्या निकालांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

जरी डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी कोवोव्हॅक्स लसीला परवानगी दिली असली तरी मात्र आता संपूर्ण परवान्यासाठी कंपनीला लसीशी संबंधित आवश्यक डेटा WHO ला सतत द्यावा लागेल.

Updated : 18 Dec 2021 8:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top