धाकधूक वाढली...निवडणूकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, निकालाकडे लक्ष..
राज्यात नगरपंचायत निवडणूका प्रचारातील आरोप प्रत्यारोपांनी चांगल्याच गाजल्या. तर विविध जिल्ह्यातील 93 नगरपंचायतीसाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले. त्यामुळे उमेदवारांसह प्रतिष्ठेची लढाई केलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली. बुधवारी 10 वा. मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील नगरपंचायत निवडणूकीत कोणत्या पक्षाला मतदार कौल देणार आणि कोण बाजी मारणार हे औत्सुक्याचे ठरले आहे.
X
राज्यात नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायतींसह भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. 15 डिसेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशतः बदल करण्यात आला. त्यामध्ये ओबीसी प्रवर्ग वगळता इतर जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेतले होते. त्यामधून ओबीसी जागा वगळण्यात आल्या होत्या. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इतर जागा अनारक्षित करून त्यासाठी 18 जानेवारी रोजी मतदान झाले. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी सरासरी 81 टक्के मतदान झाले. तर भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्यातील महापालिकांतील 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणूकाही यावेळी झाल्या. तर उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित जागांसाठी 18 जानेवारीला मतदान झाले. तर 19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान झाले.
भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 73 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 76 टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार 50 टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 19) सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.