Mulayam singh Yadav : कोण होते मुलायम सिंह यादव?
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गुरग्रामच्या मेदांता रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या ८२ वर्षांच्या आयुष्यात ५५ वर्षांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या या संपुर्ण आयुष्याचा आढावा घेत मुलायम सिंह यादव नेमके कोण होते हे जाणून घेऊयात.
X
मुलायम सिंह यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ ला स्वातंत्र्यपुर्व काळात सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यातील इटावा जिल्ह्यातील सेफई गावात झाला. मूर्ती देवी आणि सुघर सिंह यादव यांच्या शेतकरी कुटूंबात ते जन्माला आले. सहा भावंडांमध्ये त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य होते. वडील सुघर सिंह यादव हे मुलायम यांना पैलवान बनवू पाहत होते परंतू मुलायम यांचं लक्ष्य काही औरच होतं. त्यांचे राजकीय गुरू चौधरी नत्थूसिंह यांच्या पारंपारीक विधानसभा मतदार संघातून जसवंत नगर मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. ते इटावा सहकारी बँकेते डायरेक्टर देखील राहिले आहेत. पण तत्पुर्वी त्यांनी आग्रा विद्यापिठातून राज्यशास्त्रात पद्व्युत्तर शिक्षण पुर्ण केलं.
मुलायम सिंह यांना उत्तर भारतातील एक मोठे समाजवादी आणि शेतकरी नेते म्हणुन ओळखलं जातं. १९६७ साली पहिल्यांदा ते आमदार झाले आणि उत्तरप्रदेशच्या विधानसभेत पोहोचले. त्यांनी त्यांची पहिली निवडणुक सोशालिस्ट पार्टी आणि नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टी मधुन लढवली. फार कमी वेळात त्यांनी संपुर्ण उत्तरप्रदेश वर त्यांचा प्रभाव टाकला होता. त्यानंतर ५ डिसेंबर १९८९ ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत ते पहिल्यांदा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा मंत्री होण्यासाठी त्यांना १९७७ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. त्यांनंतर ते चौधरी चरण सिंह यांच्या लोकदलातून विधानसभेची निव़डणुक लढले पण त्यांना त्यात पराभव पाहावा लागला. मग पुन्हा चौदरी चरण सिंह यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. जिथे ते विरोधी पक्षनेते म्हणुन काम करत होते.
मग १९९२ ला त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. यानंतर ५ डिसेंबर १९९३ ते ३ जुन १०९९६ पर्यंत ते दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा २९ ऑगस्ट २००३ ते ११ मे २००७ पर्यंत ते तिसऱ्यांदा उत्तरुप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९९६ ला ते केंद्रीय राजकारणात सहभागी झाले. त्यांनी अकरावी लोकसभा निवडणूक मैनपुरी लोकसभा मतदार संघातून लढवली. त्यावेळी काँग्रेस ला हरवून स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीच्य़ा सरकारमध्ये ते देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. यानंतर ते बाराव्या, तेराव्या आणि पंधराव्या लोकसभेत निवडून गेले होते. २०१२ ला पुन्हा एकदा समाजवादी पक्षाचं सरकार उत्तरप्रदेश मध्ये आलं आणि त्यावेळी अखिलेश यादव हे मुख्यमंत्री झाले होते.
मुलायम सिंह यांची राजकीय कारकिर्द
- विधान परिषद १९८२-१९८५
- विधान सभा १९६७, १९७४, १९७७, १९८५, १९८९, १९९१, १९९३ और १९९६ (आठ वेळा)
- विरोधी पक्ष नेता, उत्तर प्रदेश विधान परिषद १९८२-१९८५
- विरोधी पक्ष नेता, उत्तर प्रदेश विधान सभा १९८५-१९८७
- मंत्रीपद
- उत्तरप्रदेशचे सहकार आणि पशुसंवर्धन मंत्री १९७७
- केंद्रीय संरक्षण मंत्री १९९६ – १९९८
- पुरस्कार – लंडन येथे २०१२ ला आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्काराने गौरव
मुलायम सिंह यादव यांच्यावर पुस्तके
- अशोक कुमार शर्मा यांचं मुलायम सिंह यादव – चिंतन आणि विचार
- अंशुमन यादव आणि राम सिंह यांचं मुलायम सिंह : अ पॉलिटीकल बायोग्राफी