पपईचा 'गोडवा' कुणी घालवला ?
X
पपईच्या दरात मोठी घसरण; उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
यंदा शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. कापूस, सोयाबीनच्या दरात वाढ होत नसून दर खाली घसरत आहेत. कापसाच्या दरात पुन्हा सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. यासोबतच पपईच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. यामुळे पपई उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उत्तमराव कल्याणकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली होती. त्यांना यासाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे.
एक एकर पपई मधून कल्याणकर यांना जवळपास पाच लाख उत्पन्न अपेक्षित होते. परंतु सध्या वातावरणातील बदलाचा फटका या पपईला बसत असून बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्च निघणे झाले कठीण वातावरणातील बदलाचा फटका आणि बाजारात पापईला मिळणार कवडीमोल दर यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे पपई उत्पादक शेतकरी उत्तमराव कल्याणकर यांनी सांगितले. एकवेळ पपईला चांगला भाव मिळत होता. मात्र वातावरण बदलामुळे पपईची गुणवत्ता खालावली असून दर देखील घसरले आहेत. सध्या बाजारात आठ ते दहा रुपय प्रति किलो दर पपईला मिळत आहे