बावनकुळे कोण? संजय राऊतांच्या सवालावर नितेश राणेंच खिचडी चोर म्हणत पलटवार
X
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या वक्तव्यावर आता राजकारणात पडसाद उमटत आहेत. घरातबसून पक्ष चालवतात त्यांनी आम्हाला सांगू नये असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं यावर आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की "चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? मला माहित नाही" असं खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे यावर आता
यावर उत्तर देताना राणे म्हणाले की "कोण आहेत हे बावनकुळे? म्हणणारे संजय राऊत बावनकुळेंना हे कसे ओळखणार? बावनकुळेंचं महाराष्ट्रासाठी आणि भाजपासाठी त्यांचं काय योगदान आहे? हे खिचडी चोर, पत्राचाळीतील माणसांची घरं उठवणारा चोर, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करणारा 420 राऊत यांना आमच्या बावनकुळे यांची किंमत किंवा ओळख असू शकत नाही." अशी टीका नितेश राणे यांनी राऊतांवर केली आहे. "सामान्य गरीब कामगारांची हक्काची खिचडी खाणारे हे खिचडी चोर. त्यांना बावनकुळे व फडणवीस यांचे महत्त्व कळणार नाही" असा खोचक टोलाही राणेनी राऊतांना लगावला आहे.