Home > News Update > करोनो मृतांची आकडेवारी चीनकडून लपवली जातेय का? WHO गंभीर आरोप...

करोनो मृतांची आकडेवारी चीनकडून लपवली जातेय का? WHO गंभीर आरोप...

करोनो मृतांची आकडेवारी चीनकडून लपवली जातेय का? WHO गंभीर आरोप...
X

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी चीनने करोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे. WHO ने जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सुद्धा स्पष्ट नसल्याचे सांगितले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत टेड्रोस यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे जगभरात ११ हजार ५०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ४० टक्के रुग्ण हे अमेरिका, ३० टक्के रुग्ण युरोप आणि उर्वरित ३० टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील आहेत. मात्र दुसरीकडे चीनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा लपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगभरातील करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा अस्पष्ट असल्याचे टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना करोना रुग्णांच्या मृताचा आकडा जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. करोनाच्या नवीन व्हेरिएंट विरोधात लढण्यासाठी सर्वंच देशांनी करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य माहिती देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन टेड्रोस यांनी सर्व देशांना दिली आहे. कोरोनाच्या XBB.1.5 या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सिक्वेन्सिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आम्ही सर्वच देशांना सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे करोना रुग्णांची अचूक माहिती पूढे येणास मदत होणार आहे.

२०२२ च्या डिसेंबर अखेरीस चीनने करोना निर्बंध शिथिल केले होते. मात्र चीनमध्ये जानेवारीमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दिसरीकडे चीन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते आहे, आणि WHO च्या नियमांना चीन हरताळ फासताना दिसत आहे.

Updated : 12 Jan 2023 7:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top