भारतातील दोन खोकल्यांच्या औषधांवर बंदी...जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा...
X
उझबेकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी कफ सिरप सेवन केल्याने जवळपास १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील दोन कफ सिरपवर बंदी घातली आहे. मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेले दोन कफ सिरप लहान मुलांना देण्याात येऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे. ही कंपनी मूळची भारतातील उत्तर प्रदेशची असून या कंपनीकडून Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन मारयॉन कंपनीने केले होते. या दोन कफ सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने वरील निर्णय घेतला आहे.
मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या कफ सिरप मुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उझबेकिस्तानमध्ये १९ मुलांचा मृत्यू झाला होता. ही बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्षात आल्यावंतर त्यांनी तातडीने ही दोन्ही सिरप वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. श्वसनाचा विकार तिथल्या काही मुलांना जडल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरस देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा या औषधांचा डोस अधिक दिल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेची दखल उझबेकीस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली होती. आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या दोन्ही सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.