पूजा चव्हाण प्रकरण: ...तोपर्यंत संजय राठोड नॉटरिचेबलच राहणार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Feb 2021 5:47 PM IST
X
X
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणा नंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे नॉटरीचेबल आहेत. संजय राठोड वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हजर होणार असं सांगितलं जात आहे. मात्र, ते अद्यापपर्यंत कधी हजर होणार या संदर्भात निश्चित वेळ समजलेली नाही.
या संदर्भात बंजारा समाजाच्या महंतांची एक महत्वाची बैठक पोहरादेवी येथे पार पडली. या बैठकीत संजय राठोड यांची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती होती. मात्र, बैठकीत संजय राठोड संदर्भात कोणताच निर्णय झाला नसून, संजय राठोड केव्हा माध्यमांसमोर बोलणार हे दोन दिवसांअगोदर माध्यमाला आम्ही कळवणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले...
Updated : 18 Feb 2021 5:47 PM IST
Tags: Sanjay Rathore pooja Chavan bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire