प्रचारसभेत जेव्हा अमिताभ बच्चनच्या दिशेने नांदेडकरांनी फिरकावल्या होत्या चपला..
X
लोकसभेच्या रणधुमाळीला सर्वत्र सुरुवात झाली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी महायुती व महाविकास आघाडी यांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत ,वंचितचा उमेदवार अद्याप घोषित व्हायचा आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या मागच्या काही वर्षातील आठवणीही खूप रंजक आहेत. एकदा तर हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना देखील नांदेडकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्याचे घडले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाणांनी आपल्या चिरंजीवाला म्हणजेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणूक रिंगणात उभे केले. त्याचवेळी त्यांच्या विरोधात जनता दलाचे डॉ.व्यंकटेश काब्दे निवडणूक रिंगणात होते ,त्यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीच्या वातावरणामुळे काँग्रेसने महानायक अमिताभ बच्चन यांना निवडणूक प्रचारसाठी निमंत्रित केले. प्रचंड संख्येनी लोक नांदेडमध्ये झालेल्या या विराट सभेला गर्दी केली ,आणि निवडणुकीच्या आखाड्यात हिरोंचे काय काम ? असे मत व्यक्त करणाऱ्या लोकांनी अमिताभ बच्चन यांच्या दिशेने चपला भिरकावण्यास सुरुवात केली. आणि अमिताभ बच्चन यांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला. अशी जुनी आठवण ज्येष्ठ पत्रकार सु.मा.कुलकर्णी यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना सांगितली आहे...