Home > News Update > बाबरी मशीद ज्‍या वेळी पडली, त्‍या वेळी मी तेथेच होतो - देवेंद्र फडणवीस

बाबरी मशीद ज्‍या वेळी पडली, त्‍या वेळी मी तेथेच होतो - देवेंद्र फडणवीस

आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्‍कृती जगामध्‍ये सर्वमान्‍य होणार आहे. भारतीय विचारपद्धती जग स्‍वीकारणार आहे. आता भारत हा सर्वप्रकारच्‍या गुलामगिरीतून बाहेर आलेला आहे, गुलामाचे प्रतीक संपलेले आहे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रीया दिली होती.

बाबरी मशीद ज्‍या वेळी पडली, त्‍या वेळी मी तेथेच होतो - देवेंद्र फडणवीस
X

आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्‍कृती जगामध्‍ये सर्वमान्‍य होणार आहे. भारतीय विचारपद्धती जग स्‍वीकारणार आहे. आता भारत हा सर्वप्रकारच्‍या गुलामगिरीतून बाहेर आलेला आहे, गुलामाचे प्रतीक संपलेले आहे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रीया दिली होती.

आजचा दिवस ऐतिहासिक आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. देशाचे यशस्‍वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते प्रभू श्रीराम अयोध्‍येत विराजमान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्‍न पूर्ण झाले आहे. ते पुढे म्हणाले, पाचशे वर्षाच्‍या संघर्षानंतर आपले आराध्‍य दैवत प्रभू श्रीरामलल्ला त्‍यांच्‍याच जागेत पुन्‍हा विराजमान झाले असाल्याचं म्हणाले आहेत.

लाठ्याही खाल्‍ल्‍या, गोळ्याही बघितल्या

हा पाचशे वर्षांचा संघर्ष होता, ज्‍यामध्‍ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण, आज ज्‍या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिराच्‍या निर्मितीत योगदान दिले, त्‍यांचा सत्‍कार या ठिकाणी करण्‍यात आला. हे सर्व कारसेवक म्‍हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत, जे रामकार्यासाठी त्‍या ठिकाणी गेले होते. मला अतिशय अभिमान आहे, की दोन्‍ही कारसेवेच्‍या वेळी मी त्‍या ठिकाणी होतो. बाबरी मशीद (Babri Masjid demolition) ज्‍या वेळी पडली, त्‍या वेळी मी तेथेच होतो. याचा मला अभिमान आहे. १८ दिवस बदायूंच्‍या तुरूंगात देखील होतो. लाठ्याही खाल्‍ल्‍या, गोळ्याही बघितल्या, असा दावा उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्‍कृती जगामध्‍ये सर्वमान्‍य होणार आहे. भारतीय विचारपद्धती जग स्‍वीकारणार आहे. आता भारत हा सर्वप्रकारच्‍या गुलामगिरीतून बाहेर आलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Updated : 23 Jan 2024 1:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top