Home > News Update > WhatsApp ग्रुप एडमिन्सना सायबर विभागाचा इशारा

WhatsApp ग्रुप एडमिन्सना सायबर विभागाचा इशारा

WhatsApp ग्रुप एडमिन्सना सायबर विभागाचा इशारा
X

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६२ गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५४ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

#व्हॉट्सअप ग्रुप एडमिन्सना सूचना सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअँपवर तसेच अन्य सोशल मिडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं आणि इतर माहिती प्रसारित होत आहे. त्यामुळे अशा आशयाच्या पोस्ट्स आल्या तर त्या पोस्ट्स फॉर्वर्ड करु नये, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. व्हाट्सअँप ऍडमिन किंवा निर्माते (group creator) यांनी अशी माहिती पाठवत असेलेल्या ग्रुप सदस्याची त्या ग्रुपवरून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग 'only admin' असे करावे. कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे, असा इशाराही दिला आहे.

Updated : 9 Jun 2020 8:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top