Home > Election 2020 > देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार काय ? - उद्धव ठाकरे

देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार काय ? - उद्धव ठाकरे

देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार काय ? - उद्धव ठाकरे
X

बुलढाणा : पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या शौर्यावर अविश्वास दाखवत मोदींजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोही नेत्यांच्या हाताता सत्ता देणार काय ? असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता आयोजीत सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा जाहीरनामा फसवा आहे. आम्ही ३७० कलम काढणार नाही. ही भाषा बोलली जात आहे. तर शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्याला सपोर्ट करत आहे. हा देशद्रोह नाही काय? याचा जनेतेने विचार करावा. मोदी हे दुरदृष्टी असणारे देशभक्त नेते आहेत. मोदींच्या मजबूत हातात आपला देश देण्याची गरज आहे. पाकड्यांना धडा शिकवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून द्यावेच लागेल.

नाहीतर, या देशाचे वाटोळे करण्याचे आघाडी सरकारचे स्वप्न पूर्ण होण्याची भिती आहे. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. विदर्भासह राज्यात सर्वच ठिकाणी युतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत. भारताला इटली समजण्याचा प्रयत्न करु नका. कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचविण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोहाचा कायदा रद्द करायचा आहे. हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. राममंदिर बांधण्याचे स्वप्न आम्ही निश्चित पूर्ण करू. पण त्याला विरोध करणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकवण्याची गरज आहे. भगवं वादळ फडकण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Updated : 12 April 2019 11:31 PM IST
Next Story
Share it
Top