राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होणार?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मंदिरं उघडण्यावरून वादाची ठिणगी पडली असताना आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. राज्यपालांच्या पत्राचे पडसाद बैठकीत पडणार असून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारांची यादी बैठकीत मंजूर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
X
मुंबई: कोरोना प्रादूर्भावातून महाराष्ट्राला दिलासा मिळत असताना काल दिवसभर 'राज-भवन' आणि 'मातोश्री' मधील पत्रकबाजीने राजकारण ढवळून निघाले होते. राज्य मंत्रीमंडळाच्या आज दुपारी 3.30 मिनिटानं होणार्या बैठकीत राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त होणार्या १२ सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव देखील याच बैठकीत संमत करण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे.
विधानपरिषदेच्या १२ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळणार आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांच्या नावाचा आमदार पदासाठी समावेश होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदिरप्रवेशावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात एक खरमरीत उत्तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना धाडले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कालच पंतप्रधान मोदी यांच्याकडे राज्यपालांची तक्रार पाठवली आहे. मंत्रिमंडळातील इतर सदस्य या प्रकरणावरून काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.