वॉरन बफेंना पोर्टफोलिओवर किती % रिटर्न मिळाला?
X
Warren Buffett portfolio : वॉरन बफेंना पोर्टफोलिओवर किती % रिटर्न मिळाला? | मॅक्समहाराष्ट्र
साधारण 12.5 लाख कोटींची संपत्तीची असणारे वॉरन बफे जगातले सगळ्यात श्रीमंत गुंतवणूकदार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे वॉरन बफेंना पोर्टफोलिओवर किती रिटर्न मिळाला असेल? तुम्हाला काय वाटतं? वार्षिक 30 %, 40% 50% का त्याहीपेक्षा जास्त रिटर्न मिळाला असेल? ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वॉरन बफेंना केवळ 19.8% CAGR रिटर्न मिळाला आहे.
आपल्याला इथून पुढचे 30 40 वर्ष 20 22 % CAGR रिटर्न मिळाला, तर आपण ही भारतातले वॉरन बफे होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होण्यासाठी दिवसाला 1 टक्का किंवा महिन्याला 4 % मिळवण्याची गरज नाहीये आणि एवढा रिटर्न मिळवणं शक्य ही नाहीये. त्यामुळे, पोर्टफोलिओवर 20 ते 22% रिटर्न मिळवण्यासाठी प्रयत्न करा. सातत्याने 20% CAGR मिळवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये, त्यामुळे प्रोफेशनल पोर्टफोलिओ मॅनेजरची मदत घ्या आणि शेअर मार्केटमध्ये श्रीमंत व्हा.