शरद पवार यांचं चाललंय काय?
X
शरद पवार देशातील राजकारणातली मोठं नाव. शरद पवार काय करतात? काय बोलतात? याचे नेहमी वेगवेगळे अर्थ लावले जातात. मध्यंतरी शरद पवार अमित शहा यांना भेटले. यावर वेगवेगळे अंदाज लावण्यात आले. त्यानंतर आता शरद पवार यांनी महाविकास आघाडी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढेल असं विधान केलं. आणि त्यानंतर लगेच निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी 3 तास बैठक घेतली. या बैठकीनंतर शरद पवार मोदी यांच्या विरोधात देशात एक नवी आघाडी तयार करत असल्याच्या बातम्या आल्या.
त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. एकीकडे कॉंग्रेस स्वतंत्र लढण्याचा नारा देत असताना, शरद पवार आगामी निवडणूका एकत्र लढणार असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे अमित शहा यांची भेट घेत आहेत. यामुळे शरद पवार यांचं नक्की काय सुरु आहे. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या संदर्भात जेष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान, भाजप प्रवक्ते गणेश खनकर यांच्याशी मॅक्समहाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेली बातचीत नक्की पाहा...