Home > News Update > नारायण राणे यांना नेमके झालेय काय?

नारायण राणे यांना नेमके झालेय काय?

महाविकास आघाडी सरकार पडणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना नेमकं झालंय काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यातील त्यांची पत्रकार परिषद वायरल झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समावेश यावरून त्यांच्या नावाची चर्चा खरी की खोटी? याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

नारायण राणे यांना नेमके झालेय काय?
X

केंद्रिय मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दिल्लीत गेले असल्याची चर्चा होती. मात्र राणे हे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राणे यांचे नाव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात निश्चित झाल्याचे सांगत त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माध्यमांत चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात तसे नसल्याचे समोर आले आहे.

काल दिवसभर प्रसारमाध्यमांनी राणे हे मंत्रिमंडळ विस्तार तयारीसाठी दिल्लीला गेल्याचे चित्र रंगवले होते.

प्रत्यक्षात मिळालेल्या माहितीनुसार राणे हे काल सिंधुदर्गात होते. तेथून ते गोव्याला गेले आणि नंतर मुंबईला पोहोचले. ते आजही तेथेच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राणे दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटणार अफवा असल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे दिल्लीतील राणेंच्या निवासस्थान देखील शुकशुकाट असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील राणे यांच्या निवासस्थानीही कोणतीच हालचाल नसल्याचे सांगण्यात आले. संभाव्य नावांची चर्चा असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे नेते हे संबंधितांना त्यासाठी बोलावून घेतात, तूर्तास असे काहीच नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विस्ताराविषयी चर्चा सुरू केल्याची चर्चा आहे..

भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पडताळणी आवश्यक असते.

राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस हे मोदी यांना गेल्या दहा दिवसांत दोन वेळा भेटले. तसेच इतर राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांच्याशीही मोदींनी चर्चा केल्याचे समजते आहे. त्यातून काही नावांविषयी चर्चा सुरू झाली आहे.

मोदी हे अनेकदा धक्कातंत्र अवलंबतात. त्यामुळे माध्यमांतून चर्चिली जाणारी नावे त्यांच्या यादीत हमखास नसतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे राणे यांचा खरंच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मंत्रीपदावर पाणी सोडले आहेत. सुधारित शेतकरी कायद्यावरून अकाली दलानेही इंडिया सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता त्यानंतर हसमीत कौर यांनी देखील राजीनामा दिला होता.

शिवसेना-भाजप सोबत युतीत असताना शिवसेनेने एक कलमी राणे यांना विरोध केला आहे. राणेंना राज्याच्या मंत्रीमंडळात न घेण्याच्या शिवसेनेच्या अटीमुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. तेथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. या दोन पक्षांतील संबंध विकोपाला गेल्यानंतर राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेनेला रोज पिका काम करण्याचे काम इमाने-इतबारे करत आहेत.

नारायण राणे यांनी महा विकास आघाडी सरकार पडण्या संबंधीचे भविष्यवाणी अनेक वेळा वर्तवून झाली आहे.

नुकतीच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थशास्त्रात निपुण असलेले नारायण राणे मात्र चांगलेच डिस्टर्ब असल्याचे दिसून आले.

राणेंचे काय होणार हे आता पुढच्या काळात स्पष्ट करणार आहे.

Updated : 16 Jun 2021 1:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top