#HDFCBank : HDFC बँक आणि HDFC लिमिटेडच्या विलीनकरणाचा अर्थ काय?
X
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देशातील सगळ्यात मोठी आर्थिक घोषणा झाली. यामुळे शेअर बाजारातही याचे परिणाम दिसून आले. HDFC बँकेमध्ये HDFC लिमिटेड या कंपनीचे विलिनीकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेनुसार HDFCच्या शेअर होल्डर्सना HDFC बँकेचे शेअर्स मिळणार आहेत. यातही HDFC चे २५ शेअर असलेल्या शेअरहोल्डरला HDFC बँकेचे ४२ शेअर्स मिळणार आहेत. त्यामुळे १ तारखेला बाजार बंद होताना HDFCच्या शेअरच्या किंमती जेवढ्या होत्या त्या पाहता या शेअर होल्डर्सना याचा फायदा होणार आहे.
HDFC बँक आणि HDFC लिमिटेडचे विलीनीकरण हे देशाच्या अर्थ क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यवहारांपैकी एक व्यवहार ठरला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडण्याच्या वेळी हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने HDFC बँक आणि HDFC लिमिटेडचे शेअर्स ७ टक्क्यांनी वाढले. पण हा ऐतिहासिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे HDFC बँकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये सर्व नियमन संस्थांच्या परवानग्यांचा आणि प्रक्रियेचा समावेश आहे.
HDFC लिमिटेड या गृहकर्ज पुरवठा कऱणाऱ्या कंपनीचे HDFC बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे. HDFC लिमिटेडच्या अंतर्गत सुमारे ५ लाख २६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच ४.४४ लाख कोटी रुपये एवढे कंपनीचे भांडवली मूल्य आहे. तर HDFC बँकेचे बाजारातील मूल्य ८.३५ लाख कोटी रुपये एवढे आहे.
या विलिनीकरणाच्या निर्णयानंतर HDFC बँकेत असलेली HDFC लिमिटेड कंपनीचा हिस्सेदारी संपणाप आहे. तसेच या व्यवहारानंतर HDFC बँके ही पूर्णपणे समभागधारकांच्या मालकीची बनणार आहे. पण यामध्ये ४१ टक्के हिस्सा हा HDFC लिमिटेडच्या सध्याच्या शेअर होल्डर्सचा असणार आहे. ग्राहकांची संख्या या व्यवहारामुळे वाढणार आहे.