Home > News Update > मी दादाला काय सल्ला देऊ,... - खा.सुप्रिया सुळे

मी दादाला काय सल्ला देऊ,... - खा.सुप्रिया सुळे

मी दादाला काय सल्ला देऊ,... - खा.सुप्रिया सुळे
X

पुणे - अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यावर पहिल्याच निवडणुकीमध्येच पवार कुटुंबामध्येच पवार विरुद्ध पवार असा निवडणुकीचा सामना रंगला होता. कुटुंबामध्येच होणा-या या निवडणुकीच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची चर्चा बारामती पासून देशभरामध्ये पहायला मिळाली. मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून १,५८,३३३ मतांचें मताधिक्य मिळवत विजय प्राप्त केला.

विजयानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या पुणे गुलटेकडी येथील निसर्ग कार्यालयात आल्या होत्या. या वेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाले. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला यश प्राप्त करता आले नाही. या पार्श्वभूमीवर आपण अजित पवार यांना काय सल्ला द्याल. असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना केला. मी लहान असून, मी अजित पवारांना काय सल्ला देऊ, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिले. अजित पवारांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या का या प्रश्नाचे उत्तर देत असताना. मी दोन दिवस व्यस्त असून, मला सोशल मीडिया देखील पाहायला वेळ मिळाला नाही. माझा फोन देखील माझ्याकडे नव्हता. यामुळे मला कोणी- कोणी शुभेच्छा दिल्या हे माहीत नाही. असे स्पष्टीकरण देखील सुप्रिया सुळे यांनी दिले. एकंदरीत अजित पवार यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देणे सुप्रिया सुळे यांनी टाळले आहे.

विजयानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्याने ढोल ताशाच्या गजरात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विजयाचा गुलाल देखील उधळण्यात आला.

Updated : 6 Jun 2024 3:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top