Home > News Update > बस्स साल बदला है, पहले किसान अब रुलाया पहेलवान

बस्स साल बदला है, पहले किसान अब रुलाया पहेलवान

बस्स साल बदला है, पहले किसान अब रुलाया पहेलवान
X

भाजप खासदार ब्रिजभुषण सिंग (Brij Bhushan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करीत कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. त्यावरून भाजपवर टीका केली जात आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच कुस्तीपटू विनेश फोगाट(Vinesha phogat), साक्षी मलिक (Sakshee Malik), बजरंग पुनिया (Bajrang Puniya) यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

विनेश फोगाट म्हणाल्या, टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympic) कुस्ती महासंघाचे अध्यक्ष मला खोटा सिक्का म्हणाले होते. एवढंच नाही तर त्यांनी माझा मानसिक छळ केला. तसेच ब्रिजभुषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप विनेशा फोगाट यांनी केला.

बजरंग पुनिया यांनीही कुस्ती महासंघावर टीका केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, आम्हाला या आंदोलनाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. कारण कुस्ती महासंघाच्या माध्यमातून ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्यांना आमचा विरोध आहे. तसेच देशासाठी आम्ही जेव्हा पदक जिंकतो. त्यावेळी देश आम्हाला डोक्यावर घेतो. मात्र आमच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही.

कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. त्यांना देशभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. त्यातच सोशल मीडियावर म्हटले आहे की, बस साल बदला है, पहले किसानों को रुलाया आणि अब पहेलवानोंको, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जानेवारी 2022 मध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. तर यंदा कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

Updated : 21 Jan 2023 12:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top